रावेर तालुक्यात अवकाळी पावसाने 244 कोटींचे नुकसान
प्रशासनाला पंचनाम्याचा अंतिम अहवाल प्राप्त : आता मदतीची आस
रावेर : परतीच्या पावसाने शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी, मका, सोयाबीनसह कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदाचा खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. खरीप हंगामासाठी घेतलेला पैसा व कर्ज तसेच पीक उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात ज्वारी, मका, सोयाबीन व कापूस या पिकांचे एकूण 25 हजार 304 हेक्टरवरील क्षेत्र नुकसानीने बाधीत झालेले आहे. एकूण 244 कोटी 14 लाख 60 हजार रुपयांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल प्रशासनाला प्राप्त आहे . त्यात सहा हजार 208 शेतकर्यांचे चार हजार 967 हेक्टरवरील ज्वारीचे नुकसान झाले तर दोन हजार 760 शेतकर्यांचे दोन 465 हेक्टरवरील मक्याचे तसेच 948 शेतकर्यांचे 654 हेक्टरवरील सोयाबीनचे व 16 हजार 357 शेतकर्यांचे 17 हजार 218 हेक्टरवरील कापसाचे मिळून एकूण 244 कोटी 14 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

