भुसावळात गुरूनानक जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेने वेधले लक्ष


भुसावळ- शीख धर्माचे संस्थापक तथा पहिले धर्मगुरु श्री गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्ताने शहरातील शीख समाजबांधवांतर्फे यावल रस्त्यावरील गुरुव्दारापासून शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे नांदेड व पंजाबमधील गदका पार्टीच्या युवकांनी चित्तथरारक कसरती सादर करून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, शनिवारी सकाळी युवकांनी दुचाकी रॅली काढली.

शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
श्री. गुरुनानक जयंतीनिमित्त शहरातील जळगाव रोडवरील गुरुव्दारापासून शनिवारी दुपारी शोभायात्रेला सुरवात झाली. शहरातील कुलकर्णी प्लॉट, रसोई हॉटेल, हंबर्डीकर चौक, लोखंडी बोगदा, जामनेररोड, मिरवणूक मार्ग, बाजारपेठ आदी मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेचे शहरातील विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. दरम्यान, 31 जूलैपासून 51 अखंडपाठ साहिबचे वाचन सुरू होते तर मंगळवारी या पाठसाहिब ग्रंथाची समाप्ती होणार आहे. शोभायात्रेत श्री. गुरुनानकजी रथापूढे समाजबांधवांनी रस्ता पाण्याचे धुवून तसेच झाडून सेवा दिली. समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी जळगावरोडवरील दशमेश मार्गावरील गुरुव्दारात शोभयात्रेचे फटाक्यांची आतषबाजीने स्वागत करण्यात आले.

शोभायात्रेचे लोकप्रतिनिधींनी केले स्वागत
शोभायात्रेचे खासदार रक्षा खडसे, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, सामाजिक कार्यकर्ते देवा वाणी, सुमित बर्‍हाटे यांनीही स्वागत केले तर बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, युवा कार्यकर्ते धीरज अनिल चौधरी, गटनेता उल्हास पगारे, माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, बबलू दुबे, बबलू खान, बलजीर गीर यांनी शोभायात्रेचे स्वागत केले.

मंगळवारी होणार जन्मोत्सव
शहरातील जळगावरोडवरील दशमेश मार्गावरील गुरुव्दारात मंगळवारी रात्री 10 ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत गुरुनानक जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने कथा, कीर्तन, आरती, दीपमाला, पुष्प वर्षाव, आतषबाजी आदी कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले आहे. शीख समाजबांधवांनी श्री. गुरुनानक जन्मोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुरुनानक देवजी जयंती समारोह समितीने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !