प्रवाशांना मोठा दिलासा : एलटीटी-महू दरम्यान 20 अतिजलद साप्ताहिक गाड्या धावणार !


भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेला वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता लोकमान्य टिळक टर्मिनस ते महू दरम्यान विशेष शुल्कासह 20 अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 28 एप्रिल ते 30 जूनपर्यंत चालवण्यात येणार आहेत. भुसावळ विभागातील नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी या स्थानकांवर त्यांना थांबा देण्यात आला असून 24 एप्रिलपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे.

अभियंता मुलाचा अपघाती मृत्यू ; सुनेचा सासु-सासर्‍यांनी केला पुर्नविवाह

रेल्वे गाड्यांना वाढली गर्दी
लग्नसराई, शाळांना लागलेल्या सुट्या तसेच कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा बाहेर फिरायला जाणार्‍यांची गर्दी वाढली आहे. यापैकी बहुतांश प्रवासी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. यामुळे गेल्या पंधरवड्यापासून रेल्वे गाड्यांना गर्दी वाढून वेटिंग तिकीट संख्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने एलटीटी-महू गाडी धावणार आहे. 01051 अतिजलद साप्ताहिक विशेष गाडी एलटीटी येथून गुरुवारी सकाळी 5.15 वाजता सुटेल. ती दुसर्‍या दिवशी दुपारी 12.45 वाजता महू येथे पोहोचेल. 28 एप्रिल ते 30 जूनपर्यत या गाडीच्या 10 फेर्‍या होतील. 01052 अतिजलद साप्ताहिक विशेष गाडी महू स्टेशनवरून शनिवारी सकाळी 5.45 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजता एलटीटीला पोहोचेल. 30 एप्रिल ते 2 जुलैपर्यंत या गाड्याच्या 10 फेर्‍या होतील. या गाडीला एक प्रथम वातानुकूलित, 2 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान आणि गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 7 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

या स्थानकांवर गाडीला थांबा
विशेष गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज, ग्यानपूर, बनारस आणि वाराणसी या स्थानकांवर थांबा मिळेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

शेवाळेतील दाम्पत्यास मारहाण : पाच संशयीतांविरोधात गुन्हा


कॉपी करू नका.