कचेगुडा रेल्वे स्थानकावर दोन ट्रेन समोरा-समोर धडकल्या : पाच प्रवासी जखमी
हैदराबाद – तेलंगणातील कचेगुडा रेल्वे स्थानकावरील सोमवारी सकाळी दोन ट्रेन एकाच रुळावर आल्याने त्यांची समोरासमोर धडक होून पाच प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्यांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दोन ट्रेनपैकी एक एमएमटीएस तर दुसरी इंटरसिटी एक्स्प्रेस असून ट्रेन एकाच रुळावर आल्याने त्यांची समोरासमोर धडक झाली तर ट्रेनचे काही डब्बे रुळावरून घसरले. इंटरसिटी एक्स्प्रेस ही कचेगुडा रेल्वे स्थानकात ज्या प्लॅटफॉर्मवर थांबली होती. त्याच प्लॅटफॉर्मवर एमएमटीएम ट्रेन आली आणि या दोन्ही ट्रेनमध्ये टक्कर झाली. यामध्ये पाच जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.