पत्नीच्या खूनप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यास अटक


जळगाव : पत्नीला नोकरी लावण्यासाठी माहेरुन 25 लाख रुपये न आणल्याने मुलीचा छळ करून तिला गळफास लावून ठार मारल्याची तक्रार मयत भाग्यश्रीचे वडील अरुण जगन्नाथ पाटील (रा.सौंदाणे, ता.धुळे ह.मु.धुळे) यांनी केल्यानंतर पोलिस पतीसह सासरच्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी संशयीत आरोपी व पत्नीच्या खुनाचा आरोप असलेला पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश पाटील (26, रा.नेहरु नगर,जळगाव) या यास रविवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात प्रशांतची आई प्रतिभा व वडील प्रकाश पंडित पाटील पसार असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने यापूर्वी फेटाळला आहे. दरम्यान, संशयीत आरोपी प्रशांत पाटील हा शनी पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. 27 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली होती. गुन्हा घडल्यापासून तिघे संशयीत पसार होते तर प्रशांत पाटील रविवारी एमआयडीसी पोलिसांना शरण आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !