उसनवारीच्या पैशातून कुर्हाकाकोड्यात पित्यासह मुलीवर चाकूहल्ला
मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्हाकोडा येथे उसनवारीच्या पैशातून वाद विकोपाला गेल्याने पित्यासह मुलीवर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजता संभाजीनगरात घडली. कुर्हा गावातील संभाजी नगरातील रहिवासी लक्ष्मण समाधान बोरले (32) याने त्याचा मामा तथा संशयीत आरोपी महादेव पूर्णाजी उपाध्याय ( 58, रा.चांदमारी, खामगाव) याच्याकडून एक लाख उसनवारी घेतल्यानंतर 50 हजार दिल्यानंतर उर्वरीत 50 हजारांसाठी महादेव उपाध्याय यांनी सोमवारी कुर्हा येथील लक्ष्मण बोरले यांचे घर गाठले. पैसे मागणीवरून उभयंतांमध्ये वाद विकोपाला गेल्यानंतर संशयीत उपाध्यायने घरातील चाकूने भाचा लक्ष्मण बोरोलेवर हल्ला केल्याने बोरोलेच्या पोटावर उजव्या बाजूने जखम झाली तर भांडण सोडवण्यासाठी बोरोले यांची मुलगी भक्ती (8) पुढे आल्यानंतर तिच्या डोक्याला चाकू लागल्याने मोठी जखम झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कुर्हा भागातील पिंप्राळा शेतशिवारातून संशयीत आरोपीला अटक करण्यात आली असून संशयीत पळत असतना त्यााच्या डोक्याला झाडाची फांदी लागल्याने तोदेखील जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

