रावेरात वाहतुकीला अडथळा ठरणार्या आठ विक्रेत्यांवर कारवाई
न्यायालयाने प्रत्येकी सुनावला 300 रुपयांचा दंड : कारवाईने खळबळ
रावेर : शहरातील डॉ.आंबेडकर चौक ते नवीन सावदा रोडलगत चहा व्यावसायीकांसह फळ विक्रेते, चिकन विक्रेते, पानटपरी तसेच विविध व्यावसायीकांनी टपर्या थाटून रस्ता अडवल्याने पोलिस प्रशासनाने उभयंतांवर मुंबई पोलीस कायदा 102/117 प्रमाणे कारवाई करून उभयंतांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने प्रत्येकाला 300 रुपयांचा दंड सुनावला
आठ विक्रेत्यांवर कारवाई
रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शीतलकुमार नाईक, सुनील कदम, धांडे, दिवाकर जोशी आदींच्या पथकाने रहदारीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धत्तीने लोटगाड्या लावणार्या शे.आरीफ शेख गौस मोहम्मद (नागझरी, रावेर), सै.तैय्यब सै.सज्जड (इमामवाडा, रावेर), शे.शब्बीर शे.मुसा (रा.पाणी टाकी टॉवर), शे.वसीम शे.बाबू (मोमीनवाडा, रावेर), शे.तन्वीर शे.शकील (रा.उटखेडा रोड, रावेर), शे.शोएब शे.लुकमान (रा.उटखेडा रोड, रावेर), उत्तम गोपाळ भोई (भोईवाडा), समाधान बळीराम महाजन (शिवाजी चौक, रावेर), ईश्वर शिवलाल भोई (भोईवाडा, रावेर) यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, पुन्हा वाहतुकीला अथथळा निर्माण करून लोटगाड्या लावण्यात आल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

