भुसावळातील वयोवृद्ध इसम बेपत्ता


भुसावळ- शहरातील निवृत्ती नगरातील 78 वर्षीय वयोवृद्ध बेपत्ता झाल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. नारायण चुडामण शिवपुजे (78, निवृत्ती नगर) हे 10 रोजी कुटुंबियांना गावात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले मात्र घरी परतलेच नाहीत. सर्वत्र शोधूनही ते न आढळल्याने बाजारपेठ पोलिसात राजेश शिवपूजे यांच्या खबरीनुसार हरवल्याची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !