घरफोडीसह हाणामारी व अल्पवयीन तरुणीला पळवणारा आरोपी जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
जळगाव- चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यासह बोदवडमधील हाणामारीच्या तसेच पारोळ्याहून 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीस पळवून नेणार्या आरोपीच्या मुसक्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत.
घरफोडीतील पसार आरोपी जाळ्यात
चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यातील पसार आरोपीगुरुदेवसिंग ऊर्फ लिवरसिंग बडोले (सिकलकर, 45, रा.उमर्टी, मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने , प्रवीण हिवराळे यांनी कारवाई केली. आरोपीस चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अल्पवयीन मुलीला पळवणारा जाळ्यात
पारोळ्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्या संशयीत आरोपीस अटक केली असून त्यास तपासार्थ पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 25 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री आठ वाजता 14 वर्षीय अल्पवयीन तरुणी शौचाला गेल्यानंतर न परतल्याने तिला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल होता.
यांनी आवळल्या मुसक्या
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखलाी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार विजय पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, पल्लवी मोरे यांनी पुणे जिल्यातील दौंड तालुक्यातील दापोडी शिवारातील एका हॉटेलजवळील पीडीतेसह आरोपीस ताब्यात घेत पारोळा पोलिसांच्या ताब्यात दिले.
हाणामारी : जामठीचा आरोपी जाळ्यात
बोदवड पोलिस ठाण्यात हाणामारीच्या गुन्ह्यातील पसार आरोपीला अटक करण्यात आली. राजू बाळू पाटील (39, रा.जामठी, ता.बोदवड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीत आरोपील मलकापूरला येण्याची माहिती मिळाल्यावरून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई सुनील दामोदरे, विजय शामराव पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, नंदलाल पाटील यांनी कारवाई केली. आरोपीस बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.