सांगवी बु.॥ च्या इसमाची आत्महत्या
यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे एका 41 वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडीस आली. मनोहर श्रावण सोनवणे असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. सांगवी बुद्रुक, ता.यावल येथील मनोहर श्रावण सोनवणे (41) हे मंगळवारी रात्री आपल्या घरात रात्री झोपले असताना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचे कुटुंबीय त्यांना उठवण्यासाठी गेले असता त्यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यावल पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर घटनास्थळी सहाय्यक फौजदार अजीज शेख, नागपाल भास्कर, हवालदार असलम खान हे दाखल झाले व तेथून तत्काळ मृतदेह यावल ग्रामीण भागामध्ये आणण्यात आला. डॉ. फिरोज तडवी यांनी शवविच्छेदन केले. मयत सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परीवार आहे. यावल पोलिसात विक्रम पांडुरंग बार्हे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार असलम खान करीत आहेत.

