भुसावळात वेफर्स दुकानातील 35 हजारांवर चोरट्यांचा डल्ला


भुसावळ : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्रकायम असून जळगाव रोडवरील कपिलेश्वर कॉम्प्लेक्समधील बालाजी वेफर्स दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानातील 30 हजार रुपयांच्या चिल्लरसह पाच हजार रूपयांच्या नोटा अशी 35 हजारांची रोकड लांबवली. चोरट्यांनी दोन आणि एक रुपयांची नाणी घटनास्थळीच सोडून पळ काढला. चोरट्यांनी दुकानात साहित्याची फेकाफेक केली होती. बुधवारी मॉर्निग वॉकसाठी जाणार्‍या नागरीकांना चोरीची घटना समजली. त्यांनी दुकानमालक भूषण पाटील यांना माहिती दिली. दरम्यान, या दुकानाशेजारील बालाजी ऑटो कन्सल्टन्सीमध्येही चोरीचा प्रयत्न केला मात्र तेथे चोरट्यांना काहीही न मिळाल्याने चोरांनी काचा फोडून नुकसान केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !