भुसावळातील साईजीवन सुपर शॉपीतर्फे ‘बालदिनानिमित्त विशेष ऑफर’


ओळखपत्र आणणार्‍या चिमुकल्यांना एकूण बिलावरील सुट व्यतिरीक्त अतिरीक्त तीन टक्के सुट

भुसावळ : भुसावळसह तालुक्यातील ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचे असलेल्या साईजीवन सुपरशॉपीने भारताचे पहिले पंतप्रधान स्व.जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे अर्थात बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी एकूण बिलातील सुट व्यतिरीक्त अतिरीक्त तीन टक्के सुट देण्याची विशेष ऑफर 14 ते 21 नोव्हेंबरदरम्यान सुरू केली आहे. या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपापले ओळखपत्र मात्र दाखवावे लागणार आहे.

संधी व्यवहार ज्ञान वाढवण्याची
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान हवेच ! ही संधी भुसावळातील साईजीवन सुपरशॉपीने विद्यार्थ्यांना मिळवून दिली आहे. आपापल्या घरात पाल्यांना लागणार्‍या वस्तू वा विद्यार्थ्यांना लागणार्‍या वस्तूंची छोटीशी यादी बनवून शाळेच्या ओळखपत्रासह साईजीवन सुपरशॉपीत भाऊ/बहिण/मित्र-मैत्रिणीसोबत पाठवल्यानंतर त्यांना जवाबदारीने वस्तू घेण्याचा तसेच आर्थिक व्यवहार करण्याचा आपोआप अनुभवदेखील येणार आहे शिवाय त्यांच्या मदतीसाठी साईजीवनचा सजग कर्मचारी वर्ग आहेच ! आजचे जवाबदार विद्यार्थीच हे उद्याच्या देशाचे आधारस्तंभ ठरणार असल्याने आजच संधीचे सोने करावे, असे आवाहन साईजीवनचे संचालक तथा साईसेवक व नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी केले आहे.

भुसावळातील साईजीवनचा सुपर शॉपचा पत्ता-
साईजीवन सुपर शॉप, जामनेर रोड, भुसावळ, फोन- 02582-242671
साईजीवन सुपर शॉप, यावल रोड, भुसावळ, फोन- 02582-223171




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !