घाणखेडे अपहार प्रकरण : तत्कालीन ग्रामसेवकाची पोलिस कोठडीत रवानगी


बोदवड : तालुक्यातील घाणखेडे ग्रामपंचायतीत 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक भास्कर दौलत बागुल यांना बोदवड पोलिसांनी अटक केली केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सरपंच व ग्रामसेवकांच्या संगनमतीने अपहार
घाणखेडेे ग्रामपंचायतीमध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत विद्यमान सरपंच श्रीकांत वाघोदे व तत्कालीन ग्रामसेवक बागुल यांनी संगनमताने सहा लाख दोन हजार दहा रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात विद्यमान सरपंच वाघोडे यांना अटक करण्यात आली होती तर त्यांची नंतर जामिनावर सुटका झाली मात्र तत्कालीन ग्रामसेवक बागुल हे पसार होते. मुक्ताईनगरचे उपअधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस सापळा रचुन चाळीसगाव येथून अटक करण्यात आली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस नाईक गोपाळ गव्हाळ, कॉन्स्टेबल राहुल जोहरे, महेंद्र लहासे यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !