येवतीच्या तत्कालीन सरपंचांना अटक व जामीन


बोदवड : तालुक्यातील येवती ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच यशोदाबाई रघुनाथ जंजाळ यांना गुरुवारी बोदवड पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. ग्रामपंचायतीच्या सन 2012-13-14 या वर्षांत तत्कालीन सरपंच यांनी 13 व्या आयोगात नऊ लाख 26 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात जंजाळ यांना बोदवड पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील खरे, पोलीस नाईक गोपाळ गव्हाळ, राहुल जोहरे, महेंद्र लहसे यांनी केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !