एसआरके फॅन्स क्लबने घेतली शाहरुख खानची भेट
भुसावळ : बॉलिवूडचे बाहशहा शाहरुख खान यांनी सेंट एड्यूज कॉलेज, बांद्रा येथे आपल्या चाहत्यांसोबतमिर फाउंडेशन या एनजीओमधील लोकांसोबत एक दिवस साजरा केला. शाहरुख खान दरवर्षी आपल्या चाहत्यांसाठी व त्यांच्या एनजीओमधील लोकांसाठी ‘मिट अॅण्ड ग्रिट’ कार्यक्रम साजरा करतात. याप्रसंगी चाहत्यांसोबत चर्चा, हस्तांदोलन, गळाभेट व नृत्यही ते करतात. जळगाव जिल्ह्यातील एसआरके युनिव्हर्स जळगाव फॅन क्लबमधील सदस्य अनेक समाजोपयोगी कामे करतात. गरीबांना आर्थिक मदत करणे, फळ वाटप, रक्तदान करणे आदी सेवाभावी उपक्रम नियमित राबवले जातात. एसआरके युनिव्हर्सचे जळगाव जिल्ह्यासह देश-विदेशात 500 पेक्षा जास्त सदस्य आहेत. या सर्वां सोबत शाहरुख खानने मिट अॅण्ड ग्रिट प्रसंग साजरा केला. यावर्षी एसआरके युनिव्हर्स जळगाव येथून अझहर सय्यद, सोहेल शेख, कल्पेश जोशी, प्रितेश थोरात हे सहभागी झाले.