बोदवडमधील परीचारीकेची बसमधून पोत लांबवली
बोदवड : बोदवड ग्रामीण रुग्णालयातील परीचारीका मीना रमेश सुरळकर (27, येळगाव) या मेहकर-बोदवड बसने प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाची 32 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबवली. सुरळकर या बोदवड येथे उतरल्यानंतर त्यांना गळ्यातील पोत लांबवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मलकापूर येथे जावून तक्रार नोंदवली तर शून्य क्रमांकाने हा गुन्हा बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

