भुसावळ विभागात शूरवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भुसावळ : भुसावळ शहरासह विभागात आदिवासी जननायक बिरसामुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवून मान्यवरांच्या हस्ते शूरवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बिरसा मुंडा यांच्या कार्याला मान्यवरांनी उजाळा दिला.
भुसावळातील दिनदयाल नगरात प्रतिमा पूजन
भुसावळ- शहरातील दिनदयाल नगरात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हनुमान मंदिरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी अॅड.जास्वंदी भंडारी, सामाजिक कार्यकर्ते दीपक काठे, ठाकूर समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपाळराव किसन ठाकूर, भुसावळ तालुका ठाकूर समाजाचे तालुकाध्यक्ष हिंमत ओंकार ठाकूर, प्रभागाचे नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी विजय रमेश ठाकूर, अविनाश पंडित ठाकूर, सचिन मुरलिधर ठाकूर, संजय विठ्ठल ठाकूर, उमेश प्रकाश ठाकूर, संजय नामदेव ठाकूर, चंद्रकांत अण्णा ठाकूर, नामदेव धोंडू ठाकूर, सोनू अनिल ठाकूर, सुनील ठाकूर, रवी ठाकूर, रामचंद्र वाघ, भगवान ठाकूर, राजकुमार ठाकूर, विक्की ठाकूर, सचिन ठाकूर आदींची उपस्थिती होती.
यावलला बिरसा मुंडा यांना अभिवादन
यावल- शिवसेना कार्यालयात आदिवासी जननायक बिरसामुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील बाजार समितीच्या संकुलात शिवसेना आदिवासी सेलकडून कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, बाजार समिती सभापती भानुदास चोपडे, आदिवासी सेल तालुका प्रमुख हुसेन तडवी, तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, तालुका उपप्रमुख शरद कोळी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, सुनील बारी, संतोष खर्चे, पप्पू जोशी, योगेश पाटील, सागर बोरसे, विजय पंडीत, पिंटू कुंभार, सुनिल कुंभार, बिस्मिल्ला तडवी, अनुराग तडवी, सोनू तडवी यांनी प्रतिमेचे पूजन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आर. एस. वाघ यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. शहरातील तडवी भिल बॉईजतर्फे तडवी कॉलनीत बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. किरण तडवी, सखावत तडवी उपस्थित होते.
नायगावला क्रांतीवीर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन
यावल- तालुक्यातील नायगाव येथे क्रांतिवीर भगवान बिरसामुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. सचिन तडवी यांच्याहस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कल्पेश पवार, विनोद तडवी, सुलेमान तडवी, असलम तडवी, युसूफ तडवी, मुबारक तडवी, फिरोज तडवी, जाहबीर तडवी आदी उपस्थित होते.

