मनवेलला भर दिवसा मंदिरात चोरी
मनवेल : धुनीवाले दादाजी दरबार व विठ्ठल मंदिरात शनिवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास दानपेट्या फोडून चोरट्यांनी रक्कम लांबवल्याने गावात एकच खळबळ उडाली. चोरीनंतर मात्र सायंकाळी ही घटना उघडकीस आली. यापूर्वीदेखील तीन वेळा याच मंदिरांमधून दानपेटीतील रक्कम चोरीला गेली मात्र त्यावेळी तक्रार देण्यास कुणीही पुढे न आल्याने आयतेच चोरट्यांचे फावले. मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात दोन दानपेट्या असून शनिवारी दुपारी चोरट्यांनी दोन्ही दानपेट्या फोडून त्या उलट्या ठेवत पोबारा केला आल्या तसेच गावातील विठ्ठल मंदिरातील दानपेटी लोखंडी अवजाराने भर दुपारी फोडण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली.
