भुसावळातील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालदिन उत्साहात


भुसावळ : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्व.जवाहरलाल नेहरू जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. शहरातील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालदिनानिमित्त तापी नदी रस्त्यावरील एकलव्य आदिवासी नगरातील बालकांना यानिमित्त खाऊ, बिस्किटाचे वाटप करण्यात आले तसेच वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शॉर्पनर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बालदिनाचे थोडक्यात महत्व विषद करण्यात आले. प्रारंभी चाचा नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्षा राजश्री नेवे, पत्रकार उज्ज्वला बागुल, माया चौधरी, प्रतिभा विसपुते, भाग्यश्री नेवे, मंदाकिनी केदारे, मोहिता चौधरी, स्मिता माहुरकर, वंदना झांबरे, संगीता लुल्ला, कृष्णा नेवे, जयेश नेवे, क्रिशी आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !