वीज चोरी प्रकरणी रावेरच्या एकता डेअरीला पावणेपाच लाखांचा दंड
रावेर : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ असलेल्या एकता डेअरीवर शुक्रवारी वीज वितरण कंपनीच्या जळगाव येथील भरारी पथकाने छापा टाकून वीज चोरीचा प्रकार उघडकीस आणला होता. वीज चोरी केल्याबद्दल डेअरी चालकास चार लाख 85 हजार 700 रुपये दंड ठोठावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव येथील वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकत वीज चोरी उघडकीस आणली होती. वीज संच मांडणीत बदल करीत डेअरी व्यावसायिकाने वीज चोरी केल्याचे सिद्ध झाल्याने चार लाख 85 हजार 700 रुपयांचा दंड सुनावला असल्याची माहिती रावेर विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांनी दिली.

