खंडव्यातील पादचारी पूल हटणार : 19 रोजी कटनी पॅसेंजर रद्द
भुसावळ : खंडवा रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल अभियांत्रिकी विभागातर्फे 19 नोव्हेंबर रोजी हटवण्यात येणार असून त्यासाठी सकाळी 10.35 ते 1.55 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामासाठी गाडी क्रमांक डाऊन 51187 भुसावळ-कटनी पॅसेंजर 19 रोजी रद्द करण्यात येणार असून अप 51686 अप बीर-खंडवा शटल तसेच डाऊन 51685 खंडवा-बीर शटल रद्द करण्यात आली तसेच 22 रोजी अप 51188 कटनी-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

