स्वामी नारायण भगवानांचा वचनामृत ग्रंथ आता मराठी भाषेत


शास्त्री भक्तिकिशोरदास यांनी केले भाषांतर ; वडताल येेेेथे द्विशताब्दी महोत्सवात प्रकाशन

फैजपूर : हरीभक्त यांना भक्ती, सुख,शांती व जिवन जगण्याचा मार्ग दाखविणारा भगवान श्री स्वामी नारायण यांनी लिहिलेला ‘वचनामृत’ या गुजराती भाषेतील ग्रंथ आता मराठी भाषेत उपलब्ध झाला आहे. श्री.स्वामी नारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष वेदांत व्याकरणाचार्य शास्त्री भक्तीकिशोरदास यांनी या ग्रंथाचे मराठी भाषेत रूपांतरण (भाषांतर) केले आहे. या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच वडताल (गुजरात) येथे झाले.

वचनामृत द्विशताब्दी महोत्सवात ग्रंथाचे प्रकाशन
वडताल येथील श्री स्वाम नारायण मंदिरात वचनामृत द्विशताब्दी महोत्सव सुरू आहे. या कार्यक्रमात आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज, नौतम स्वामी, स्वामी नारायण मंदिराचे कोठारी स्वामी घनश्याम प्रकाशदास यांच्याहस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी सावदा स्वामी नारायण गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकाशदासजी, उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदास, भक्तिस्वरूपदास आदी उपस्थित होते. याप्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले अभिनेता गोविंदा यांना शास्त्री भक्तिकिशोरदासजी यांनी वचनामृत ग्रंथ व ऑडीओ पेन ड्राईव्ह भेट दिला. यावेळी अभिनेता गोविंदा मराठी भाषेत म्हणाले मला खूप मनस्वी आनंद झाला मी नशीबवान आहे की मला या मराठी ग्रंथाची आशीर्वादरुपी भेट मिळाली. मी अवश्य या ग्रंथाचे वाचन करेल, असेही ते म्हणाले.

शास्त्री भक्तीकिशोरदास यांच्या कार्याचे कौतुक
आचार्य राकेश प्रसाद महाराज म्हणाले स्वामी नारायण भगवान यांनी मानवाच्या कल्याणासाठी लिहिलेल्या वचनामृत हा ग्रंथ संप्रदायातील प्रमुख ग्रंथ असून त्याचे गुजराती भाषेचे मराठी भाषेत रूपांतरण करण्याचे कार्य शास्त्री भक्तीकिशोरदास यांनी अनेक दिवस खूप मेहनत घेऊन लीलया पार पाडले. मराठी हरीभक्त यांना या ग्रंथाचा खूप उपयोग होऊन समाजात सत्संगाचा प्रसार होईल, असेही ते म्हणाले. शास्त्री भक्तीकिशोरदास यांच्या या कार्याचे सर्वच संतांनी कौतुक केले.

वचनामृत ग्रंथ भाषांतराची संधी हे माझे अहो भाग्य -शास्त्री भक्तीकिशोर दास
भगवान श्री स्वामी नारायण यांनी स्वरचित केलेल्या वचनामृत या गुजराती भाषेतील महान व पवित्र ग्रंथाचे मराठी भाषेत भाषांतर करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. महाराष्ट्र व विशेषत: खान्देशातील मराठी हरिभक्त यांना स्वामी नारायण भगवान यांचे जीवन उपयोगी तत्व ध्यान आता आपल्या मायबोली मराठी भाषेत उपलब्ध करून दिल्याचा मला अतिशय मनस्वी आनंद होत असल्याचे शास्त्री भक्तीकिशोर दास यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !