भुसावळात गुरे चोरी : आरोपी जाळ्यात
भुसावळ : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल पालखीमागील भागातून दोन गायींसह वासरूची चोरी झाली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात जावेद नजीर कुरेशी (25, रा.कुरेशी मोहल्ला, यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता मात्र आरोपी पसार होता. आरोपी यावल शहरातील खॉजा नगरी भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
महिनाभरापासून पसार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
तक्रारदार मन्सुर खान उर्फ बंटी ईस्माईल खान (31, रा.शिवाजी नगर, भुसावळ) यांच्या मालकिच्या गोठ्यातून 1 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता दोन गायींसह एक वासरूची आरोपी जावेद कुरेशीने चोरी केली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल होता मात्र आरोपी पसार झाला होता. शनिवारी आरोपी यावलमध्ये आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, माणिक सपकाळे, शंकर पाटील, रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली. तपास नाईक रवींद्र बिर्हाडे करीत आहेत.

