शहरातील माओवाद जंगलातील माओवादापेक्षा घातक


कॅप्टन स्मिता गायकवाड : रावेरात रंगपंचमी व्याख्यानमाला

रावेर : देशात आराजकता पसरवून भारतातील संसदीय लोकशाही उखडून टाकण्याचा प्रयत्न माओवादी संघटनेकडून होत आहे मात्र शहरातील पोलीस यंत्रणेकडून त्यांचा डाव हाणून पाडला जात आहे. शहरातील माओवाद जंगलातील माओवादापेक्षा घातक असल्याचे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी येथे केले. शहरातील सरदार जी.जी.हायस्कुलच्या रंगमंचावर भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन आयोजित रंगपंचमी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफतांना कॅप्टन स्मिता गायकवाड बोलत होत्या.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाश मुजूमदार, विश्वस्त डॉ.राजेंद्र आठवले, अध्यक्ष विठोबा पाटील, सचिव अनिल महाजन, सदस्य हेमेंन्द्र नगरीया आदी उपस्थित होते.




माओवाद व नक्षलवाद केवळ शब्दांचा खेळ
कॅप्टन गायकवाड पुढे म्हणाल्या की, 1967 मध्ये चीनमधील माओ स्टॅॅलीन यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या लोकांनी माओवाद भारतात आणला. स्टॅॅलीनच्या चीनने कधीचाच माओवाद मागे सोडला आहे. माओवाद आणि नक्षलवाद वेगळ्या संघटना नसून फक्त शब्दांचा घोळ आहे. 1967 मध्ये जो उठाव झाला तो नक्षलवादी नावाच्या गावात झाला यामुळे नक्षलवाद हे नाव पुढे आले. या संघटनेने त्यांचे वेगवेळ्या ठिकाणी तळ निर्माण केले व शहरी माओवाद आणला असल्याचे मत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले. 1967 मध्ये नक्षलवादी गावात उठाव झाला, त्याला माओवाद्यांनी क्रांती म्हटले आहे. माओवाद्यांचा उद्देश सत्ता काबीज करण्याचा आहे. तो भारतात अस्तित्वात असणार्‍या लोकशाहीने तत्वाने नाही तर बंदुकीच्या जोरावर करण्याच्या. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काही दिवसापूर्वी फोर्थ जनरेशन वॉरफेअर बद्दल मत व्यक्त केले. यात शत्रू कोण आहे हे समजणे कठीण असते. युद्ध आणि राजकारण लढाऊ आणि नागरीक यांच्यातला फरक कळत नाही. कळत-नकळत यात लोकांना सामील करून घेतले जाते त्यामुळे, असे शत्रू हे जंगलात राहणार्‍या शत्रूपेक्षाही भयंकर असल्याचे त्यांनी सांगितले.ही माहिती देतांना त्यांनी जी.एन.साईबाबा, श्रीधन श्रीनिवासन, सुजल अब्राहम यांचे उदाहरणे देवून शहरी माओवाद स्पष्ट करून दिला. त्यांनी माओवाद्यांच्या 14 निरनिराळ्या संघटना व 7 फ्रंट असल्याची माहिती दिली. 1967 मध्ये माओवाद्यांनी आपले बस्तान बसवून 2002 पर्यंत 40 निरनिराळ्या तुकड्या निर्माण केल्या. भारत बलाढ्य देश आहे त्यामुळे तुकड्यातून लढणे शक्य नाही यामुळे ते एकत्र येत सीपीआय माओवादी संघटना स्थापन केली. भारताविरुद्ध लढाईला त्यांनी क्रांती म्हटले आहे. दीर्घकालीन युद्धाने जिंकण्यासाठी त्यांची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत कांता बोरा तर प्रास्ताविक व परीचय विश्वस्त डॉ.राजेंद्र आठवले तसेच सूत्रसंचालन अध्यक्ष अनिल महाज व आभार कैलास वानखेडे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !