भुसावळातील सेंट्रल रेल्वे विद्यालयात ‘फिट बॉडी फिट माईंड’ सप्ताह उत्साहात


भुसावळ : शहरातील सेंट्रल रेल्वे विद्यालयात सीबीएससीच्या परीपत्रिकाप्रमाणे ‘फिट बॉडी फिट माईंड’ सप्ताह साजरा करण्यात आला. प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच जीवनज्योती हेल्थ केयर आणि निसर्गोपचार केंद्राचे संचालक गोपाळ सोनवणे आणि डॉ.ज्योती सोनवणे यांनी प्रात्यक्षिक आणि व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना योगाचे आणि निरोगी राहण्याचे महत्व सांगितले. शैक्षणिक समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञ सप्ताहाची सांगता सुमित्रा गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना आहार आणि आरोग्याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन संतोष उपाध्याय यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.एस.पाठक, प्राचार्य सतीश कुलकर्णी, उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !