भुसावळातील प्रभाग 13 मध्ये सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन
भुसावळ : भुसावळातील प्रभाग 13 मध्ये सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधे हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून गांधी नगर, हनुमंत चामुंडेश्वर मंदिर परीसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ तसेच सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, प्रभागाचे नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेविका व शिक्षण सभापती मंगला आवटे, गौरव आवटे, रवी लेकुरवाळे, किशोर टोके, दिलीप धुमाळ, प्रकाश लवंगडे, दिनकर लेकुरवाळे, कैथवास, पवार, मधुकर वाघ, रंगनाथ दाते, मंगलसिंग राजपूत, प्रेम खरारे, प्रभागातील ज्येष्ठ नागरीक, शंभुराजे ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.



