भुसावळ पालिकेच्या सभेत पेंन्शन विक्रीसंदर्भातील ठराव रद्द


भुसावळ : भुसावळ पालिकेच्या सोमवारी झालेल्या विशेष सभेत पेंन्शनर कर्मचार्‍यांना देण्यात येणारा पेन्शन विक्रीचा फायदा कायद्याने देता येता किंवा नाही, याबाबत शंका असल्याने यापूर्वी पालिकेने 17 फेब्रुवारी रोजी केलेल्या ठराव क्रमांक 154 रद्द करण्यात आला तसेच जैवविविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

पेन्शन विक्रीबाबतचा ठराव रद्द
भुसावळ पालिकेतील कर्मचार्‍यांना यांना पेंन्शन विक्री देणे बाबतचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असून सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सेवानिवृत्त होऊन 15 ते 20 वर्ष झाल्याने यांना पेंन्शन विक्रीचा फायदा कायद्याने देता येतो की नाही? याबाबत साशंकता असल्याने भुसावळ पालिकेने 17 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या नगरपालिका सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 154 नुसार ठराव पारीत केला तो सोमवारच्या सभेत बहुमताने स्थगित करण्यात आला. शहरात जैवविवधता अधिनियम 2002 मधील कलम 41 व महाराष्ट्र राज्य जैवविविधता नियम 2008 मधील नियम 23(2) अंतर्गत जैवविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्याबाबतच्या ठरावालाही अनुमती देवून बहूमताने मंजूरी मिळाली. सभेच्या सुरवातीला नगसेवक प्रा सुनील नेवे यांनी नगरसेवक रविंद्र खरात व रिपांईचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या आई शांताबाई सूर्यवंशी यांच्या निधनामुळे शोकप्रस्ताव मांडल्यानंतर सभागृहाने श्रध्दांजली अर्पण केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !