रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्रीकांत महाजन
उपसभापतीपदी उस्मान तडवी यांची वर्णी : नूतन पदाधिकार्यांचा नामदार जावळेंनी केला सत्कार
रावेर : रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे श्रीकांत महाजन तर उपसभापतीपदी काँग्रेसचे उस्मान तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती डी.सी.पाटील व उपसभापती कैलास सरोदे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रीक्त झालेल्या पदावर सोमवारी निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एम.गायकवाड यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य गोपाळ महाजन यांनी केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी बाजार समिती संचालक दिलीप पाटील, कैलास सरोदे, डॉ राजेंद्र पाटील, राजीव पाटील, गोपाळ नेमाडे, नीळकंठ चौधरी, गोंडू महाजन, विनोद पाटील, प्रमिला पाटील, कल्पना पाटील, पितांबर पाटील, प्रमोद धनके, अरुण पाटील, पंकज येवले, योगेश पाटील, सै.असगर सै.तुकडू, अर्जुन महाजन आदींची उपस्थिती होती. यावेळी निवडीची घोषणा होताच कार्यकत्यानी ढोल-तासे वाजवित एकच जल्लोष करण्यात आला.
निवडीनंतर पदाधिकार्यांचे अभिनंदन
निवडीनंतर आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, माजी हरीभाऊ जावळे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सदस्या योगीता वानखेडे, कविता कोळी, जुम्मा तडवी, दीपक पाटील, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, केर्हाळा सरपंच राहुल पाटील, विशाल पाटील, भातखेडा सरपंच कैलास पाटील, अटवाडे सरपंच गणेश महाजन, उटखेडा सरपंच सविता संजय गाढे, महेश चौधरी, प्रल्हाद पाटील, माजी उपसभापती महेश पाटील, संदीप सावळे, अॅड.प्रवीण पाचपोहे, तुकाराम बोरावले, हरलाल कोळी, चिनावल नरेंद्र पाटील, डॉ.सुभाष पाटील आदींनी नूतन पदाधिकार्यांचा गौरव केला.

