राष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर वरणगाव महामार्गावर डागडूजीला सुरुवात


भुसावळ : भुसावळातील नाहाटा कॉलेजपासून वरणगावपर्यंतच्या मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती तर दोन दिवसात खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत सोमवारी दुपारपासून डागडूजीला सुरवात झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसह वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान कामाला सुरवात झाल्याने राष्ट्रवादीने नियोजन आंदोलन मागे घेतले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणामुळे अवजड डंपरची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे वरणगाव-भुसावळ महामार्गावरील खडका चौफुली, लाल जैन मंदिर, साकरी फाटा, दीपनगर, हिरा मारुती मंदिर आणि फुलगाव या मार्गावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. या रस्त्याची दोन दिवसात डागडूजी न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे आदींनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या प्रकरणी महामार्ग प्राधिकारणाचे संचालक सिन्हा यांनी तत्काळ दखल घेवून सोमवारी दुपारपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरवात केली. यामुळे आता वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे, युवक तालुकाध्यक्ष निळू चौधरी, जीतू राणे, राजेश चौधरी, पप्पू जकातदार, गजानन वंजारी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !