राज्यातील शेतकर्यांना केंद्र सरकारने मदतीचा हात द्यावा
खासदार रक्षा खडसे यांची लोकसभेत मागणी
भुसावळ- अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेती उद्ध्वस्त झाली असून तब्बल 93 लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळामुळे शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानासंदर्भात लोकसभेत चर्चा करावी आणि शेतकर्यांना योग्य मदत केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत बोलताना केली. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर आठ हजार रुपये तर बागायती पिकांसाठी 18 हजार रुपये जाहीर केली आहे. ही मदत देतानाही अटी शर्ती टाकण्यात आल्या आहेत. केवळ दोन हेक्टरपर्यंतच्याच नुकसानीला मदत मिळणार असून ही मदत तुटपुंजी आहे. महाराष्ट्रातील पिकांचे झालेले नुकसानीची भरपाई केंद्र सरकरकडूनही मिळावी यासाठी लोकसभेत चर्चा करावी आणि शेतकर्यांना योग्य मदत केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत बोलताना केली.