अत्याचारानंतर विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न


धुळे : तालुक्यातील हडसुणे येथे शेतात शौचास जाणार्‍या विवाहितेवर दुचाकीवरून आलेल्या संशयीत आरोपीने अत्याचार करीत पळ काढला. या घटनेनंतर पीडितेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोमवारी केला. या घटनेनंतर घाबरलेली पीडिता घरी आल्यानंतर तिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला तर वेळीच ही घटना लक्षात आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात बुट्या उर्फ प्रमोद नारायण अहिरे-भील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !