मसाका ऊस तोड व वाहतूक ठेकेदार यांचे उपोषण मागे


फैजपूर : गळीत हंगाम 2018-19 मधील तसेच मागील ऊस तोड व वाहतूक ठेकेदार यांचे थकीत पेमेंट मिळण्यासाठी 13 सप्टेंबरपासून सुरू असलेले उपोषण मंगळवारी सुरेश पाटील ऊस तोडणी व वाहतूक उपसमिती चेअरमन यांनी उपोषणार्थी यांच्याशी थकीत ऊस तोड व वाहतूक पेमेंट भविष्यात उपलब्ध झाल्यानंतर अदा करण्याबाबत सकारात्मक चर्चा केल्यानंतर उपोषणार्थींनी सकारात्मक भूमिका घेतल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे, रमेश महाजन, कार्यकारी संचालक एस.आर.पिसाळ, के.डी.भंगाळे, मुख्य शेती अधिकारी तसेच उपोषणार्थी सुरेश कोळंबे, चोलदास पाटील व सर्व ठेकेदार उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !