केर्‍हाळातील दोघा महिला शेतमजुरांची हत्या : दोन संशयीत ताब्यात


रावेर : चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या रावेर तालुक्यातील केर्‍हाळा खुर्द येथील दोघा मजूर महिलांचा एकाच वेळी निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. नसीबा रुबाब तडवी (50) व शालूबाई गौतम तायडे (55) या महिला चारा आणण्यासाठी शेतात गेल्यानंतर त्यांचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली होती.

दोघा मजूर महिलांचा एकाच वेळी खून
तालुक्यातील केर्‍हाळा खुर्द येथील नसीबा रुबाब तडवी (50) व शालूबाई गौतम तायडे (55) या दोन्ही मजूर महिला सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास म्हशी व बकर्‍यारसाठी चारा आणण्यासाठी गेल्या मात्र रात्र होऊनही त्या दोन्ही घरी न परतल्याने त्यांचा शोध घरच्या लोकांकडून केर्‍हाळा व परीसरातील शेत शिवारात सुरू करण्यात आला मात्र दुसर्‍या दिवसापर्यंतही शोध न लागल्याने पुन्हा शेत-शिवारात शोध मोहिम सकाळपासून दोन्ही महिलांच्या कुटुंबियांकडून व गावातील युवकांकडून राबवली जात असताना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास खेडी शिवारात मजूर महिला नसीमा यांचा मृतदेह केर्‍हाळा बुद्रुक येथील नारायण रामचंद्र पाटील यांच्या तुरीच्या शेतात तर शालूबाईचा मृतदेह केर्‍हाळा खुर्द येथील विठ्ठल नारायण सोनवणे यांच्या तुरीच्या शेतात आढळला. दोघा महिलांचे मृतदेह 20 ते 25 फूट अंतरावर आढळले. मयतांच्या डोक्यावर, गळ्यावर तसेच छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !