भुसावळात स्वामी नरेंद्राचार्य दर्शन सोहळा


भुसावळ : अनंत विभुषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळ्यासाठी शहरासह खान्देशातील सुमारे आठ हजारांवर भाविकांनी उपस्थिती दिली. शहरातील अष्टभुजा देवी मंदिरापासून संतोषीमाता हॉल शेजारील कार्यक्रम स्थळापर्यंत दिव्य पादूकांची शोभायात्रा काढण्यात आली. दुपारच्या सत्रात स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे एक तासाचा संत्संग रेकॉर्डींग व्हिडीओव्दारे दाखविण्यात आला. तर नाणीजधाम मठातील प्रबोधनकार अंजली पांगोरे यांनी जगत्गुरु श्रींच्या संदेशावर मार्गदर्शन केले.

शहरात शोभायात्रेने वेधले लक्ष
सकाळी आठ वाजता अष्टभुजा देवी मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात कलशधारी महिला, ध्वजधारी भाविक, तसेच सामजिक संदेश देणारे फलक घेतलेल्या महिला अग्रस्थानी होत्या. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या या शोभायात्रेत तब्बल आठ हजार भाविक सहभागी झाले. मंडपात भक्त आणि शिष्यांनी वैयक्तीक व सामुहिक पध्दतीने पादूकांचे पुजन केले. गुरुपूजनाची सांगता श्री लिलामृत ग्रंथाच्या पारायणाने करण्यात आली. प्रवचन संपल्यानंतर विभागातील तब्बल 135 साधकांनी सादक दीक्षा घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !