भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपीला अटक
भुसावळ : शहरातील रेल दुनिया परीसरातील भुसावळ हायस्कूलजवळ एका संशयीताजवळ कट्टा असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना करताच पथकाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी विकास देविदास सपकाळे (40, रा.हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या ताब्यातून 10 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व 500 रुपये किंमतीचे काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई उपअधीक्षक गजाजन राठोड व पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबेे, उपनिरीक्षक वैभव पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार .मोहम्मद अली सैय्यद, हवालदार आशा तडवी, नाईक सुनील सैंदाणे, कॉन्स्टेबल समाधान पाटील, भूषण चौधरी, जितू सोनवणे, मोहन पाटील, विशाल साळुंखे आदींच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध जितेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.

