Rajendra Dayama Passes Away शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे निधन : उद्या अंत्ययात्रा


Former Shiv Sena district chief Rajendra Dayama passes away : Funeral procession tomorrow भुसावळ : शहरातील टीव्ही टॉवरजवळील रहिवासी व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र देविलाल दायमा (70) यांचे अल्पशा आजाराने सोमवार, 13 रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास निधन (Rajendra Devilal Dayama Passes Away)  झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, 14 रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परीवार आहे. ते औरंगाबाद हायकोर्टातील अ‍ॅड.निर्मल दायमा यांचे वडील होत.

सच्चा शिवसैनिक हरपला
शिवसेनेचा सच्चा व निष्ठावान शिवसैनिक म्हणून राजेंद्र दायमा (Rajendra Devilal Dayama Passes Away)  यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेनेवर असलेली त्यांची निष्ठा पाहता सर्वाधिक काळ त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी सोपवण्यात आली होती.

म्हणूनच कट्टर शिवसैनिक ही ओळख
1980 च्या दशकाच्या मध्यपासून भुसावळ शहरात शिवसेना रूजविण्याचे काम ज्या शिवसैनिकांनी केले, त्यात राजेंद्र दायमा यांचा मोठा वाटा होता. नव्वदच्या दशकात ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले. 1995 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भुसावळ विधानसभा मतदारसंघातून तिकिट जाहीरदेखील झाले होते मात्र स्थानिक समीकरणे पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भुसावळ येथील विराट सभेत त्यांच्या ऐवजी दिलीप भोळे यांना उमेदवारी जाहीर केली आणि भोळे नंतर दोनदा आमदार झाले मात्र असे असूनही खट्टू न होता राजेंद्र दायमा हे शेवटपर्यंत आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पहिल्या युती सरकारच्या काळात त्यांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कट्टर शिवसैनिक ही ओळख त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवल्याने प्रत्येक शिवसैनिकाला त्यांच्याविषयी नितांत आदर होता.


कॉपी करू नका.