मुंबई हावडासह भुवनेश्वर एक्स्प्रेसला आता एलएचबी कोचेस
भुसावळ : रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक दर्जेदार सेवा सुखकर प्रवास होण्यासाठी रेल्वे गाड्यांना एलएचबी कोसेस जोडले जात आहेत. त्यानुसार अप-डाऊन 12880 व 12879 भुवनेश्वर-लोकमान्य तिळक व 12809/12810 मुंबई-हावडा मेलला एलएचबी कोचेस जोडण्याचा निर्णय घेतला आहे. अप 12880 भुवनेश्वर-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस 21 नोव्हेंबरला तर डाऊन 12879 लोकमान्य तिळक टर्मिनस भुवनेश्वर एक्सप्रेस 22 नोव्हेंबर रोजी एलएचबी कोचेस घेवून धावणार आहे. शिवाय गाडी क्रमांक 12810 हावडा-मुंबई मेल (व्हाया नागपूर) 21 नोव्हेंबर रोजी तसेच डाऊन 12809 मुंबई-हावडा मेल (व्हाया नागपूर) 23 रोजी एलएचबी कोचेससह धावणार आहे. एकूण 22 डबे या गाड्यांना जोडण्यात येणार असून प्रवासासाठी अत्यंत आरामदाशी कुशन तसेच सामान ठेवण्यासाठी प्रशस्त जागा व बायोटॉयलेटची त्यात सोय करण्यात आली आहे.

