हद्दपार आरोपी अजयसिंग उर्फ पापाराम रायसिंग पंडित पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : हद्दपार असतानाही कायद्याचे उल्लंघण करीत शहरात बेकायदेशीररीत्या शहरात फिरणारा आरोपी अजयसिंग उर्फ पापाराम रायसिंग पंडित (25, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील टिंबर मार्केट भागातून अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात मुंबई पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजाजन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक नेव्हील बाटली, रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !