जळगाव महापालिकेच्या लाचखोर कर्मचार्‍याला एक दिवसाची कोठडी


जळगाव : गाळ्याचा कर कमी करण्यासाठी चार 100 रुपयांची लाच स्वीकारतांना जळगाव महापालिकेचा चौकीदार विलास भिका पाटील (55, गिरणा पंपींगजवळ, जळगाव) यास मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली होती. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तक्रादार यांचा पिंप्राळा परीसरात गाळा असून त्यापोटी असलेला कर कमी करून देण्यासाठी विलास भिका पाटील (55) याने मंगळवारी चार हजार 100 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पथकाने आरोपीस सापळा रचून अटक केली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !