भुसावळात पोलिसांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी
भुसावळ : शहरातील यावल रस्त्यावरील नवीन विश्रामगृहासमोर दोघा पोलिसांमध्येच किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शहर पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व शहर पोलिस ठाण्याच कर्मचारी भूषण चौधरी हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कामासाठी गेल्यानंतर तेथे त्यांची निलंबित पोलिस कर्मचारी गोपाळ रामचंद्र सोनवणे यांच्याशी भेट झाली. उभयंतांमध्ये यावेळी वाद होवून सोनवणे यांनी चौधरी यांना शिविगाळ करीत मारहाण केली तसेच पोलिस ठाण्यात ड्युटी कशी करतो? असे म्हणत धमकी दिल्याचा आरोप आहे.
