जळगाव जिल्ह्यातील 14 उपनिरीक्षकांसह पाच सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या


जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी काढले आदेश

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील 14 उपनिरीक्षकांसह पाच सहाय्यक निरीक्षकांच्या विनंती तसेच प्रशासकीय कारणावरून बदल्या करण्यात आल्या असून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गुरूवार, 21 रोजी सायंकाळी याबाबतचे आदेश काढले आहेत.

14 उपनिरीक्षकांच्या बदल्या
उपनिरीक्षक कैलास भारसके यांची नियंत्रण कक्षातून मुक्ताईनगरला, आर्थिक गुन्हे शाखेचे अनिसोद्दीन शेख यांची रावेरला, जिविशाचे दिलीप पाटील यांची जळगाव शहरला, भुसावळचे रीडर गणेश कोळी यांची भुसावळ शहरला, नियंत्रण कक्षाचे खेमराज परदेशी यांची शनीपेठला, नियंत्रण कक्षातील जिजाबराव पाटील यांची फैजपूरला, जिविशाचे निशीकांत जोशी यांची जळगाव तालुका, नियंत्रण कक्षाचे युवराज अहिरे यांची जामनेरला, नियंत्रण कक्षातील कैलास आकुले यांची वाचक पाचोरा उपविभागात, नियंत्रण कक्षातील दिलीप पाटील यांची जळगाव शहर वाहतूक शाखेत, बाजारपेठच्या सुनीता कोळपकर यांची यावलला, रामानंदनगरचे रोहिदास ठोंबरे यांची फैजपूरला, जामनेरचे विकास पाटील यांची भुसावळ बाजारपेठला, जळगाव शहर वाहतूक मुनसफखान मियाखान पठाण यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.

पाच सहाय्यक निरीक्षकांच्याही बदल्या
भुसावळ बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक रावसाहेब किर्तीकर यांची चाळीसगाव शहर वाहतूक शाखेत, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांची चाळीसगाव ग्रामीणला, वाचक शाखेचे राजेश शिंदे यांची जिविशा, जळगाव तर यावलच्या सारीका वसंत खैरनार यांची भुसावळ बाजारपेठला तसेच जिविशाचे मनोजकुमार राठोड यांची बाजारपेठ पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !