आमदार एकनाथराव खडसेंवर शुभेच्छांचा वर्षाव
कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड : गावा-गावात झळकले बॅनर्स
मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेसह चुरशीच्या झालेल्या विधान परीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे 29 मते मिळवून विजयी झाले. तब्बल पावणे तीन वर्षानंतर नाथाभाऊंची विधी मंडळात एंट्री झाली असून खडसे आमदार झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष व आनंदाचे वातावरण आहे. मुंबईत निकाल जाहीर झाल्यानंतर खडसे यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी एकनाथराव खडसे यांचे बुके देवून स्वागत केले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील, माजी नगरसेवक व अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सुनील नेवे माजी आमदार गुरुमुख जगवानी, पृथ्वीराज पाटील, प्रमोद सावदेकर (जळगाव) आदींची उपस्थिती होती.

विधान परीषद निवडणुकीत नाथाभाऊंचा दणदणीत विजय
