जळगाव कारागृहातून आरोपीचा पलायनाचा प्रयत्न फसला


कर्मचार्‍यांची सतर्कता : झटापटीत कारागृह कर्मचारी जखमी

जळगाव : सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचे कामकाज अमळनेर न्यायालयातून आटोपल्यानंतर संशयीत आरोपी राकेश वसंत चव्हाण (28, अमळनेर) यास गुरुवारी सायंकाळी सात वाजता जळगाव कारागृहात आणल्यानंतर आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देत पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र कर्मचार्‍यांनी आरडा-ओरड केल्याने त्यास पकडण्यात आले मात्र झटापटीत कारागृह कर्मचारी प्रकाश कोकणी हे जखमी झाले. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !