सुरवाडेच्या विवाहितेची आत्महत्या : चौघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी


बोदवड : तालुक्यातील सुरवाडे बुद्रुक येथील विवाहिता ट्विंकल हेमंत मिस्तरी (21) हिने सासरच्या जाचास कंटाळून गॅसच्या सहाय्याने स्वतःला पेटवून घेत 10 नोव्हेंबर रोजी जीवनयात्रा संपवली होती. या प्रकरणी विवाहितेची आई सुवर्णा विजय दांडगे (38) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी व पती हेमंत गोपाल मिस्तरी, सासरे गोपाल शंकर मिस्तरी, सासू तुळसाबाई गोपाल मिस्तरी व दीर विजय उर्फ उमेश गोपाल मिस्तरी तसेच ंजय नामदेव राऊत (सर्व राहणार सुरवाडे बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्या.गरड यांनी त्यांना पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी संजय नामदेव राऊत हा पसार झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !