भुसावळात भाजपातर्फेही सरकार स्थापनेचा जल्लोष


भुसावळ : भुसावळातील जामनेर रोडवरील आमदारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार संजय सावकारे यांनी आतषबाजी केली. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे यांना आमदारांनी पेढा भरवला तसेच कार्यकर्त्यांनाही पेढे वाटप करण्यात आले.

या पदाधिकार्‍यांची उपस्थिती
प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, किरण कोलते, राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, परीक्षीत बर्‍हाटे, दिनेश नेमाडे, किरण चोपडे, रमाशंकर दुबे, देवा वाणी, दीपक धांडे, नंदकिशोर बडगुजर, प्रा.प्रशांत पाटील, पवन बुंदेले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !