शिरपूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह सहा.अभियंत्यांची कोठडीत रवानगी


शिरपूर : इलेक्ट्रिक ठेकेदाराचे नवीन कामाचे इस्टिमेट मंजूर करून जुन्या झालेल्या कामाचे मोबदला म्हणून 71 हजारांच्या लाच स्वीकारणार्‍या शिरपूर उपविभागाचे वर्ग एकचे उप कार्यकारी अभियंता सुदर्शन गुलाबराव साळुंखे, (52, रा.प्लॉट नं.61, श्रद्धानगर कॉलनी, नकाने रोड, देवपूर, धुळे) तसेच वर्ग दोनचे सहाय्यक अभियंता स्वप्नील अशोक माळी (29, वरूळ कक्ष कार्यालय, ता.शिरपूर जि.धुळे) यांना धुळे एसीबीच्या पथकाने शिरपूरातील कार्यालयात पंचांसमक्ष लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले होते. आरोपींना शनिवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपींची आता कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !