भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या कारवाईत चौघे जुगारी जाळ्यात


भुसावळ : शहरातील दिनदयाल नगर भागात जुगाराचा डाव रंगात आला असताना बाजारपेठ पोलिसांनी धाड टाकत चौघा जुगारींच्या मुसक्या आवळल्या. झन्ना -मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या रहिम शेख मोहम्मद (24), तस्लीम शहा जाफर शहा (37), मेहबुब शहा मस्तान शहा (40), साबीर शहा हसन शहा (61) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून दोन हजार 220 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार शंकर पाटील, दीपक जाधव, रमण सुरळकर, कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, सचिन पोळ, मंदार महाजन आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.