राखाड वाहतूक करणार्‍या डंपरमुळे वरणगावकरांचे आरोग्य धोक्यात


वरणगाव- दीपनगर ते मुक्ताईनगर महामार्गावरील रस्त्याच्या कामासाठी राखेचे डंपर रेल्वे स्टेशन ते वरणगाव बसस्थानकमार्गे धावत असल्यामुळे ही राख रस्त्यावर व नागरीकांच्या डोळ्यात जात असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वरणगावातून ही वाहतूक बंद करण्यात यावे, अशी वरणगाव पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.

राखाडमुळे व्यावसायीक त्रस्त
वरणगाव शहरातून बायपास महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यासाठी लागणारी राख विल्हाळे शिवारातील राखेच्या बंडातून सिध्देश्वरनगर व वरणगाव रेल्वे स्टेशन बसस्थानक मार्गाने राखेचे डंपर जात असल्याने ही राख हवेने उडून व खाली पडल्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरीकांच्या डोळ्यात तसेच व्यवसायीकांच्या दुकानात उडत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरणगाव शहरातून वाहतूक करणारे डंपर अन्य मार्गाने वळविण्यात यावे, या मागणीचे निवेदन वरणगाव पोलिसांना देण्यात आले आहे. निवेदनावर व्यावसायीक पंकज पाटील, अनिल पाटील, नितीन खाचणे, प्रशांत झोपे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !