भरधाव ओमनी उलटल्याने मजूर जखमी
बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील : अवैध वाहतूक जोमात
यावल : भरधाव ओमनी उलटल्याने मजूर जखमी समोरून येणार्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव ओमनी उलटल्याने ओमनी चालकासह मजूर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील रावेरी-यावल-चोपडा रस्त्यावर घडली. सुमारे आठ मजुरांना घेवून ओमनी (एम.एच. -19-ए.6869) चितोड्याहून यावलकडे भरधाव वेगाने निघाली असताना समोरून भरधाव येणार्या दुचाकी चालकास वाचविण्याच्या प्रयत्नात ओमनी रस्त्याच्या तीन ते चार वेळा उलटी झाल्याने गाते (सावदा रेल्वे स्टेशन) येथील काही मजूर व ओमनी चालक किरकोळ जखमी झाले. गाते येथील मजूर नेहमीप्रमाणे किनोद, ता.चोपडा येथे मजुरीसाठी ओमनी वाहनातून जाताना सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावर अपघात बघणार्याची मोठी गर्दी जमली. बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वाहतूक सुरू असल्याने पोलिस प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा आहे.
