जळगावात राजकारण पेटले : शिवसेनेच्या दोन महिला पदाधिकार्‍यांचा राजीनामा


Politics Erupts in Jalgaon : Two Women Shiv Sena Office Bearers Resign जळगाव  : राज्यात शिवसेनेला दररोज धक्क्यावर धक्के बसत असतानाच आता जळगावातूनही दोन महिला पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव शिवसेना महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा शोभा चौधरी, शहराध्यक्षा ज्योती शिवदे यांनी राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, चौधरी व शिवदे यांनी आपल्या वैयक्तीक कारणांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. तर आपला कुणावरही रोष नसून आपण शेवटपर्यंत शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

बंडखोर नगरसेवकांनी गुलाबराव पाटलांची घेतली भेट
महानगरपालिकेतील भाजपचे बंडखोर नगरसेवक अ‍ॅड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, प्रवीण कोल्हे, चेतन सनकत, नगरसेविका प्रतिभा देशमुख यांच्यासह नगरसेविका उषा पाटील यांचे पती माजी नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेवक सुनील पाटील, नगरसेविकास रेश्मा काळे यांचे पती कुंदन काळे, गजानन देशमुख यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

धक्कादायक  ! : भाषण सुरू असतानाच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर झाडल्या गोळ्या




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !